Saturday, September 1, 2018

अशी सुरु झाली असावी tattoo ची कथा

अशी सुरु झाली असावी tattoo ची कथा
                    
पूर्वी काळी होती गोंधनांची प्रथा
हाती नक्षी काढत असे किंवा पुढे करी माथा
जरी वेदना जाणवायच्या तरी सांगत नव्हते व्यथा
परंपरंच्या नवा खाली यांच्याही बनल्या गाथा
       बहुतेक अशी सुरु झाली असावी tattoo ची कथा....

भटक्या लोकांनी याची सुरुवात केली होती
प्रथा होईल पुढे चालुन याची बहुतेक कल्पना नव्हती
आपला माणुस ओळखता यावा या साठी त्यांची युक्ती होती
असो ,तो काळ गेला आता सुरु झाल्या fashion च्या वाटा
                 बहुतेक अशी सुरु झाली असावी tattoo ची कथा....


गोंधनांची जागा आता tattoo ने घेतली
नाक्षांची संख्या वाढुन देहावर रांगोळी आली
 इंद्रधनुष्य पांघरलाय जणु fashion च्या नावा खाली
 सुंदर देहा वर लाऊन डाग होतोय अट्टाहास खोटा
    बहुतेक अशी सुरु झाली असावी टॅटू ची कथा......
                                               -भावना राऊत

Tuesday, August 28, 2018

आठवणीचे रक्षाबंधन

            आठवणीचे रक्षाबंधन

श्रावण मासातील पहीला सण
ज्याचं नाव रक्षाबंधन
भावनडांच्या नात्यातली हीच एक गुंफण
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन......

कल्पना नाही सत्य घटना सांगते
आम्हा भावंडाच दृश्यामय चित्र दाखवते
सांगताना मला थोडीशी हुर हुर वाटते
 भावाची धडपड पाहुन माझं मन आलंय भरुन
     मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन...

भावनडां मध्ये आम्ही आहोत तिघे जण
मि मोठी ,भाऊ छोटा आणि मधीली आमची बहीण
तीन टोकाचे तीन स्वाभाव तरी तयार झालाय त्रिकोण
भांडणं टाळावी म्हणुन आम्ही भावालाही घेतलंय वाटुन
मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

भाऊबीजेला माझा तर रक्षा बांधनाला बहिणीचा
दोघीं मध्ये वाटुन घेतला जणु प्रश्नच नाही वादाचा
इथुन मागे ठीक होते ,आता खेळ आमच्या सणांचा
बहिणी कडुन नाही जमले ठरवलेल्या नियमाचे पालन
मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

दोन दिवस आधी राखी केली मि कुरिअर
भेटेल की नाही असे वाटत होते कारण त्या दिवशी रविवार
खुश झाला भाऊ जाणुन राखी मिळणार
ठाऊक नव्हते त्याला या वेळेस फजिती होणार म्हणुन
    मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन ...

कुरिअर पोहचले होते पण भावास भेटले नव्हते
फोन बंद होता जणु , त्यालाच कळाले नव्हते
दुसऱ्या दिवशी फोन उघडताच कुररिअर वाल्याचा msg आला होता
आता सुचेना काय करावे वाटले याला वेळ गेली निघुन
       मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

हाल केले स्वतःचे बिचाऱ्याने रडुन रडुन
सॉरी म्हणाला , दीदी मि नाही केले मुद्दामुन
तुम्ही पाठवलेली राखी परत गेला घेऊन
त्याच्या शब्दांची भाऊक्ता पाहुन माझे डोळे गेले पाणाऊन
     मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन....


रडणे झाले होते त्याचे आता कामाला तो निघाला होता
मनाला लाउन घेतले त्याने जणु तो चुकलाच होता
पोहचताच ठिकाणावर मित्र आता भेटला होता
चौकशी करत भावाला प्रश्न तो विचारत होता
कारे मित्रा तुझं पारसल घेतलंस का माझ्या घरुन
तु नव्हतास काल मग मिच ठेवले ते घेउन
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन....

आता भावाच्या जीवाला प्राण ज्योत मिळाली
आनंद व्यक्त करायला जागाच नव्हती राहिली
उड्या मारत म्हणाला ताई राखी आता मिळाली
पॅकिंग चा विडिओ काढुन स्टेटस ला बसलाय ठेउन
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन...
                                -भावना राऊत

Friday, August 3, 2018

सगळीच नाती खोटी

           सगळी नाती खोटी

जन्मानंतर देहाची होतेच केव्हातरी माती
तरी का कोणास ठाऊक आपणास हवी असते नाती
सिद्ध करण्यास स्वतःला लोकां पुढे झटतो दिवसां राती
संबंधांची जवळुन पाहिल्यास दिसते यादी मोठी
               वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

खरे आहे की खोटे हे मीच तुम्हाला विचारते
नाही नाही वास्तविकतेचे दर्शनच आज घडवते
माफ करा जर चुकत असेल तर थोडं विचित्रच बोलते
मनात चालली आहे माझ्या नात्यां बद्दल वादा- वादी
      वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

कर्तव्याचे पालन व्हावे हे बालपणा पासुन ऐकते गजर
वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा बदलते त्यांची नजर
संयमाचा बांध तुटतो पाहुन अपेक्षांचा कहर
उगाच नाही जात लोक सोडुन गाव शहर आणि नाती-गोती
          वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

उद्देश एकच आहे सांगायचा सर्वांना
आपणच समजुन घ्यावं आपल्या लोकांना
नाका जागा देऊ संबंधात राजकारणांना
तोडुन जगता येत नाही नात्यांच्या रेशीम गाठी
मानव जन्मीच आहे या गाठी भेटी
परत पडता कामा नये शब्द कोणाच्या ओठी
         की वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....
                                                   -भावना राऊत


Wednesday, August 1, 2018

अखेर च्या श्वासा पर्यंत स्वतः च्या प्रेमात असाव
अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतः च्या प्रेमात असाव

जन्माला आलोय तर प्रेमाचा आनंद घेऊन पहाव
गुरफाटुन ठेवलेल्या मनाला कधी तरी मोकळं सोडावं
दुसऱ्यांसाठी नाही स्वतः साठी जगावं
आपल्या हृदय स्पंदनाच्या कार्यास आपणच कारण बनावं
             अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतः च्या प्रेमात असाव....

           कार्याला पूर्ण होण्यास जर ध्येय असावे वाटते
          मग जगण्यास नाही का कारण असावे लागते?
         जबाबदारी दुसऱ्यांची नाही स्वतः साठी देखील असते
          इवल्याश्या जीवनाला आपलं आपणच सांभाळावं
               अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतःच्या प्रेमात असाव....

दुसऱ्यांवर प्रेम करु नये असं मी नाही म्हणत
कारण नात्यां शिवाय जीवनाला अर्थच नाही उरत
आधुनिक जीवन शैली बदलुन जगण्याची आहे गरज
स्वतःवर प्रेम केल्या शिवाय कोणी दुसऱ्यावर करत नसावं
              म्हणुन अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतःच्या प्रेमात असाव
                                                            -भावना राऊतMonday, July 9, 2018

                          लाजण
काय असतं हे लाजण ?
कधी दिसुन येतात का ही लक्षणं ?
कसे समजुन येत हे वागणं ?
गुंतागुंती चा प्रश्न आज आहे सोडवणं
                     काय असतं हे लाजण ?....
           खोडकर मिश्किल असणं
           मनातल्या मनात खुदकन हसणं
          काही विषयांवर आणि शब्दांवर बवरणं
         सगळं कळुनही न कळल्या सारख दाखवणं
                         काय असतं हे लाजण ?.....
भावना आहे ही असे काही जण म्हणतात
नाही तरी कसे म्हणु कारण हे सगळ्यांनाच असतात
बालकां पासुन वृद्धांना सर्वांनाच अनुभव येतात.
उत्सुकता वाढवणार जणु हेच एक खेळणं
                 काय असतं हे लाजण ?.....
                                          -  भावना राऊत
      

Saturday, June 23, 2018

         

                 पहीला पाऊस पडतो
        वर्षाचे चार महिने जीव घेणा वाटतो
        निसर्गाच्या नियमाला कोण अडऊ शकतो ?
        जेव्हा निळ्या निळ्या आकाशात तापलेला गोळा येतो
        तेव्हा शाळकरी मुलांना सुट्टयांची मजा देतो
        पण आनंद तर तेव्हाच येतो जेव्हा पहिला पाऊस पडतो....

रोखलेल्या श्वासात जणु प्राण अर्पण होते
ओसाड पडलेल्या रानात पाखरांची चाहुल लागते
मग वृद्धां पासुन लहानांन पर्यंत भिजण्याची ओढ असते
जेव्हा काळ्या काळ्या ढगांचा संच आकाशात दिसु लागतो .
           पण आनंद तर तेव्हाच येतो जेव्हा पहिला पाऊस पडतो....

   काहींच्या साठवलेल्या आठवणींना जणुं पुन्हा उजाळा देतो
   काहींना नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन आठवणी देऊन जातो .
   पावसाच्या पहिल्या सरीत कधी गारांचा वर्षाव करतो
   कधी तप्त मातीतुन येणारा सुगंध देऊन जातो .
    पण आनंद तर तेव्हाच येतो जेव्हा पहिला पाऊस पडतो....
                                                                 -  भावना राऊत

Tuesday, June 12, 2018

                 बालपण

पाखरां सारख स्वच्छंद फिरण
भवऱ्या सारख चोहीकडे बागडण
मनसोक्त दिवसभर खेळत बसण
तरी फुलांसारखं टवटवीत राहण
                         खरंच आठवत ते बालपण ...
शाळेत जायला नको म्हणुन रडणं
गेल्यावर मात्र तेथेच रमुन जाण
स्वतः चा डबा स्वतः कधी न खाणं
मैत्रिणी च्या डब्याशी अदलाबदल करणं
                       खरंच आठवत ते बालपण ...

आईच्या कुशीत झोपायला भावाशी भांडण
बाबांच्या छडी पाहुन येत होतं अंगी वळण
त्या वेळेस असे वाटे कधी येईल मोठेपण ?
आता देवाला म्हणते पुन्हा देशील का ते जीवन
           खरंच आठवत ते बालपण ...
                          -    भावना राऊत
Sunday, June 10, 2018

             


  प्रेम म्हणजे काय आहे ?


काल मला भेटायला दोन मुली आल्या 
बराच वेळ अंगणात माझी वाट पाहत बसल्या 
उत्साह दाखवत एक मुलगी म्हणाली 
विचारु का मला एक  शंका आहे 
                     सांगा प्रेम म्हणजे काय आहे ?...

प्रेम आभास आहे ? की ,
जीवनातला एक प्रवास आहे ?
जोडीदाराचा सहवास आहे ? की,
स्वतःला सिद्ध करावयाचा अट्टहास आहे ?
                  सांगा प्रेम म्हणजे .......

बोलक्या डोळ्यात त्यांच्या उत्सुकता दिसुन आल्या होत्या 
घाबरणाऱ्या नजरेने त्या मला पाहत होत्या 
एका मागे एक आशा अनेक प्रश्न त्या विचारत होत्या  
माझ्या कडुन उत्तर मिळेल अशी खात्री करुन आल्या आहे
                             सांगा प्रेम म्हणजे .....

लाजऱ्या स्वरात एक बोलली आम्हाला उत्तर हवय
मि म्हणाले प्रेमात पडुन पहा का,अनुभव नकोय ?
आता मात्र कपाळांवर शंकेच्या रेषा आल्या 
तरी गालातल्या गालात हसुन पुन्हा तेच विचारात बसल्या .
                                सांगा प्रेम म्हणजे .........

                                                               -    भावना राऊत

  

Sunday, June 3, 2018

त्याग


                           
    

                                                    

            
   
                     त्याग

   
   

             कर्तव्याला ति प्राधान्य देते 
                 कुकर्म किंवा निष्कर्माला नाही,
                  दुसऱ्यांसाठी जगते ति नेहमी
                  स्वतः साठी मात्र काही करत नाही 
                      म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ......
                                     
     मनावर ठेवते संयम स्वतःच्या
    इच्छा आकांशा कधी दाखवत नाही ,
    निस्वार्थ मनाने कार्य करते
    तिचा स्वार्थ मात्र बाळगत नाही 
                म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ......

                  जुन्या इमारती सारखी उभी असते
                   ती आज रचलेल्या पायांसारखी नाही 
                  मिळो ना मिळो केवळ वाट पाहते
                  ती मिळावं अशी अपेक्षा ठेवत नाही .
                 म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ......

   दैवी गुण असावी ती कि निसर्गाने दिलेली भेट 
   मनुष्याने निर्माण केलेला कायदा किंवा नियम नाही 
   सर्व गुणांमध्ये सर्व श्रेष्ठ सद्भावना आहे ती 
    कोणाची रचना किंवा कोण्या कवीची कविता नाही 
                  म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ....... 
                                                         - भावना राऊत       

                                                                                                                                                - 

Thursday, May 24, 2018

तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते

  
             तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते ....


    जेव्हा कोणाचे आई वडील असे म्हणतात की 
    तुझ्या सारखी जबाबदार मुलगी आम्हाला हवी होती
                       तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते ....

    जेव्हा कोणाचा भाऊ मला असा म्हणतो
    अशी जाब विचारणारी बहीण हवी होती
                        तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते ....

    जेव्हा कोणाची बहीण असे म्हणते की,
    अशी पाठीशी घालणारी खंबीर बहीण हवी होती 
                           तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते...

    जेव्हा कोणाचे शेजारी असे म्हणतात 
     अशी शिष्ट शेजारी नको होती
                         तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते...

   जेव्हा कोणी कॉलीग असे म्हणते की 
   अशी protectiv सिनिअर हवी होती
              तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते...

  जेव्हा कोणाचा बॉयफ्रेंड असा म्हणतो की 
   तुझ्या सारखी loving   and caring अशी  girlfriend हवी होती 
               तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते...

    
जेव्हा कोणाचा husband असे म्हणतो की ,
तुझ्या सारखी suporting and undipandent women wife म्हणुन हवी होती
                  तेव्हा मला माझे जीवन सफल वाटते...
                                                  -भावना राऊत