Friday, August 3, 2018

सगळीच नाती खोटी

           सगळी नाती खोटी

जन्मानंतर देहाची होतेच केव्हातरी माती
तरी का कोणास ठाऊक आपणास हवी असते नाती
सिद्ध करण्यास स्वतःला लोकां पुढे झटतो दिवसां राती
संबंधांची जवळुन पाहिल्यास दिसते यादी मोठी
               वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

खरे आहे की खोटे हे मीच तुम्हाला विचारते
नाही नाही वास्तविकतेचे दर्शनच आज घडवते
माफ करा जर चुकत असेल तर थोडं विचित्रच बोलते
मनात चालली आहे माझ्या नात्यां बद्दल वादा- वादी
      वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

कर्तव्याचे पालन व्हावे हे बालपणा पासुन ऐकते गजर
वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा बदलते त्यांची नजर
संयमाचा बांध तुटतो पाहुन अपेक्षांचा कहर
उगाच नाही जात लोक सोडुन गाव शहर आणि नाती-गोती
          वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

उद्देश एकच आहे सांगायचा सर्वांना
आपणच समजुन घ्यावं आपल्या लोकांना
नाका जागा देऊ संबंधात राजकारणांना
तोडुन जगता येत नाही नात्यांच्या रेशीम गाठी
मानव जन्मीच आहे या गाठी भेटी
परत पडता कामा नये शब्द कोणाच्या ओठी
         की वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....
                                                   -भावना राऊत






1 comment: