Showing posts with label आठवणीचे रक्षाबंधन. Show all posts
Showing posts with label आठवणीचे रक्षाबंधन. Show all posts

Tuesday, August 28, 2018

आठवणीचे रक्षाबंधन

            आठवणीचे रक्षाबंधन

श्रावण मासातील पहीला सण
ज्याचं नाव रक्षाबंधन
भावनडांच्या नात्यातली हीच एक गुंफण
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन......

कल्पना नाही सत्य घटना सांगते
आम्हा भावंडाच दृश्यामय चित्र दाखवते
सांगताना मला थोडीशी हुर हुर वाटते
 भावाची धडपड पाहुन माझं मन आलंय भरुन
     मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन...

भावनडां मध्ये आम्ही आहोत तिघे जण
मि मोठी ,भाऊ छोटा आणि मधीली आमची बहीण
तीन टोकाचे तीन स्वाभाव तरी तयार झालाय त्रिकोण
भांडणं टाळावी म्हणुन आम्ही भावालाही घेतलंय वाटुन
मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

भाऊबीजेला माझा तर रक्षा बांधनाला बहिणीचा
दोघीं मध्ये वाटुन घेतला जणु प्रश्नच नाही वादाचा
इथुन मागे ठीक होते ,आता खेळ आमच्या सणांचा
बहिणी कडुन नाही जमले ठरवलेल्या नियमाचे पालन
मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

दोन दिवस आधी राखी केली मि कुरिअर
भेटेल की नाही असे वाटत होते कारण त्या दिवशी रविवार
खुश झाला भाऊ जाणुन राखी मिळणार
ठाऊक नव्हते त्याला या वेळेस फजिती होणार म्हणुन
    मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन ...

कुरिअर पोहचले होते पण भावास भेटले नव्हते
फोन बंद होता जणु , त्यालाच कळाले नव्हते
दुसऱ्या दिवशी फोन उघडताच कुररिअर वाल्याचा msg आला होता
आता सुचेना काय करावे वाटले याला वेळ गेली निघुन
       मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

हाल केले स्वतःचे बिचाऱ्याने रडुन रडुन
सॉरी म्हणाला , दीदी मि नाही केले मुद्दामुन
तुम्ही पाठवलेली राखी परत गेला घेऊन
त्याच्या शब्दांची भाऊक्ता पाहुन माझे डोळे गेले पाणाऊन
     मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन....


रडणे झाले होते त्याचे आता कामाला तो निघाला होता
मनाला लाउन घेतले त्याने जणु तो चुकलाच होता
पोहचताच ठिकाणावर मित्र आता भेटला होता
चौकशी करत भावाला प्रश्न तो विचारत होता
कारे मित्रा तुझं पारसल घेतलंस का माझ्या घरुन
तु नव्हतास काल मग मिच ठेवले ते घेउन
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन....

आता भावाच्या जीवाला प्राण ज्योत मिळाली
आनंद व्यक्त करायला जागाच नव्हती राहिली
उड्या मारत म्हणाला ताई राखी आता मिळाली
पॅकिंग चा विडिओ काढुन स्टेटस ला बसलाय ठेउन
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन...
                                -भावना राऊत