Tuesday, August 28, 2018

आठवणीचे रक्षाबंधन

            आठवणीचे रक्षाबंधन

श्रावण मासातील पहीला सण
ज्याचं नाव रक्षाबंधन
भावनडांच्या नात्यातली हीच एक गुंफण
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन......

कल्पना नाही सत्य घटना सांगते
आम्हा भावंडाच दृश्यामय चित्र दाखवते
सांगताना मला थोडीशी हुर हुर वाटते
 भावाची धडपड पाहुन माझं मन आलंय भरुन
     मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन...

भावनडां मध्ये आम्ही आहोत तिघे जण
मि मोठी ,भाऊ छोटा आणि मधीली आमची बहीण
तीन टोकाचे तीन स्वाभाव तरी तयार झालाय त्रिकोण
भांडणं टाळावी म्हणुन आम्ही भावालाही घेतलंय वाटुन
मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

भाऊबीजेला माझा तर रक्षा बांधनाला बहिणीचा
दोघीं मध्ये वाटुन घेतला जणु प्रश्नच नाही वादाचा
इथुन मागे ठीक होते ,आता खेळ आमच्या सणांचा
बहिणी कडुन नाही जमले ठरवलेल्या नियमाचे पालन
मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

दोन दिवस आधी राखी केली मि कुरिअर
भेटेल की नाही असे वाटत होते कारण त्या दिवशी रविवार
खुश झाला भाऊ जाणुन राखी मिळणार
ठाऊक नव्हते त्याला या वेळेस फजिती होणार म्हणुन
    मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन ...

कुरिअर पोहचले होते पण भावास भेटले नव्हते
फोन बंद होता जणु , त्यालाच कळाले नव्हते
दुसऱ्या दिवशी फोन उघडताच कुररिअर वाल्याचा msg आला होता
आता सुचेना काय करावे वाटले याला वेळ गेली निघुन
       मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन.....

हाल केले स्वतःचे बिचाऱ्याने रडुन रडुन
सॉरी म्हणाला , दीदी मि नाही केले मुद्दामुन
तुम्ही पाठवलेली राखी परत गेला घेऊन
त्याच्या शब्दांची भाऊक्ता पाहुन माझे डोळे गेले पाणाऊन
     मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन....


रडणे झाले होते त्याचे आता कामाला तो निघाला होता
मनाला लाउन घेतले त्याने जणु तो चुकलाच होता
पोहचताच ठिकाणावर मित्र आता भेटला होता
चौकशी करत भावाला प्रश्न तो विचारत होता
कारे मित्रा तुझं पारसल घेतलंस का माझ्या घरुन
तु नव्हतास काल मग मिच ठेवले ते घेउन
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन....

आता भावाच्या जीवाला प्राण ज्योत मिळाली
आनंद व्यक्त करायला जागाच नव्हती राहिली
उड्या मारत म्हणाला ताई राखी आता मिळाली
पॅकिंग चा विडिओ काढुन स्टेटस ला बसलाय ठेउन
   मला ही भेटले आठवणीचे रक्षाबंधन...
                                -भावना राऊत

Friday, August 3, 2018

सगळीच नाती खोटी

           सगळी नाती खोटी

जन्मानंतर देहाची होतेच केव्हातरी माती
तरी का कोणास ठाऊक आपणास हवी असते नाती
सिद्ध करण्यास स्वतःला लोकां पुढे झटतो दिवसां राती
संबंधांची जवळुन पाहिल्यास दिसते यादी मोठी
               वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

खरे आहे की खोटे हे मीच तुम्हाला विचारते
नाही नाही वास्तविकतेचे दर्शनच आज घडवते
माफ करा जर चुकत असेल तर थोडं विचित्रच बोलते
मनात चालली आहे माझ्या नात्यां बद्दल वादा- वादी
      वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

कर्तव्याचे पालन व्हावे हे बालपणा पासुन ऐकते गजर
वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा बदलते त्यांची नजर
संयमाचा बांध तुटतो पाहुन अपेक्षांचा कहर
उगाच नाही जात लोक सोडुन गाव शहर आणि नाती-गोती
          वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....

उद्देश एकच आहे सांगायचा सर्वांना
आपणच समजुन घ्यावं आपल्या लोकांना
नाका जागा देऊ संबंधात राजकारणांना
तोडुन जगता येत नाही नात्यांच्या रेशीम गाठी
मानव जन्मीच आहे या गाठी भेटी
परत पडता कामा नये शब्द कोणाच्या ओठी
         की वास्तव पाहता लक्षात येते सगळी नाती खोटी....
                                                   -भावना राऊत






Wednesday, August 1, 2018

अखेर च्या श्वासा पर्यंत स्वतः च्या प्रेमात असाव




अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतः च्या प्रेमात असाव

जन्माला आलोय तर प्रेमाचा आनंद घेऊन पहाव
गुरफाटुन ठेवलेल्या मनाला कधी तरी मोकळं सोडावं
दुसऱ्यांसाठी नाही स्वतः साठी जगावं
आपल्या हृदय स्पंदनाच्या कार्यास आपणच कारण बनावं
             अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतः च्या प्रेमात असाव....

           कार्याला पूर्ण होण्यास जर ध्येय असावे वाटते
          मग जगण्यास नाही का कारण असावे लागते?
         जबाबदारी दुसऱ्यांची नाही स्वतः साठी देखील असते
          इवल्याश्या जीवनाला आपलं आपणच सांभाळावं
               अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतःच्या प्रेमात असाव....

दुसऱ्यांवर प्रेम करु नये असं मी नाही म्हणत
कारण नात्यां शिवाय जीवनाला अर्थच नाही उरत
आधुनिक जीवन शैली बदलुन जगण्याची आहे गरज
स्वतःवर प्रेम केल्या शिवाय कोणी दुसऱ्यावर करत नसावं
              म्हणुन अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतःच्या प्रेमात असाव
                                                            -भावना राऊत