Sunday, June 10, 2018

             


  प्रेम म्हणजे काय आहे ?


काल मला भेटायला दोन मुली आल्या 
बराच वेळ अंगणात माझी वाट पाहत बसल्या 
उत्साह दाखवत एक मुलगी म्हणाली 
विचारु का मला एक  शंका आहे 
                     सांगा प्रेम म्हणजे काय आहे ?...

प्रेम आभास आहे ? की ,
जीवनातला एक प्रवास आहे ?
जोडीदाराचा सहवास आहे ? की,
स्वतःला सिद्ध करावयाचा अट्टहास आहे ?
                  सांगा प्रेम म्हणजे .......

बोलक्या डोळ्यात त्यांच्या उत्सुकता दिसुन आल्या होत्या 
घाबरणाऱ्या नजरेने त्या मला पाहत होत्या 
एका मागे एक आशा अनेक प्रश्न त्या विचारत होत्या  
माझ्या कडुन उत्तर मिळेल अशी खात्री करुन आल्या आहे
                             सांगा प्रेम म्हणजे .....

लाजऱ्या स्वरात एक बोलली आम्हाला उत्तर हवय
मि म्हणाले प्रेमात पडुन पहा का,अनुभव नकोय ?
आता मात्र कपाळांवर शंकेच्या रेषा आल्या 
तरी गालातल्या गालात हसुन पुन्हा तेच विचारात बसल्या .
                                सांगा प्रेम म्हणजे .........

                                                               -    भावना राऊत

  

3 comments:

 1. प्रेम म्हणजे काय असत.
  प्रेम म्हणजे नात्यातला ओसावा.
  प्रेम म्हणजे नात्यातला जिव्हाळा.

  ReplyDelete
 2. प्रेम म्हणजे काय असत.
  प्रेम म्हणजे नात्यातला ओसावा.
  प्रेम म्हणजे नात्यातला जिव्हाळा.

  ReplyDelete
 3. dhanyawad nokiaji
  pudhchya kavite madhe premachya saglya rachana publish kelya janar ahet

  ReplyDelete